HSC Result Maharashtra 2025: आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे याबाबत सविस्तर माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेली आहे. तर मंगळवार 6 मे पासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटप केले जाणार आहेत. याबाबत देखील शिक्षण मंडळाकडून माहिती देण्यात आलेली आहे.
HSC Result Maharashtra 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिकृत सूचना जाहीर करण्यात आलेल्या असून या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करणार आहे. बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निकाल जाहीर करण्याबाबत माहिती देण्यात आलेली होती. आणि आज एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना आपला आपला https://mahresult.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. आणि विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिकेची प्रत देखील डाऊनलोड करता येणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आलेली होती. ( HSC Result Maharashtra 2025 )
निकाल पुढील संकेतस्थळावर पाहता येणार
मित्रांनो, तुम्हाला आपला निकाल चेक करण्यासाठी आपला बैठक क्रमांक आणि आईचे नाव असणे आवश्यक आहे. निकालानंतर पुढील येत्या काही आठवड्यामध्ये शिक्षण मंडळाकडे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहेत. तसेच जुलै ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. आणि त्याचा निकाल देखील शिक्षण मंडळाकडून सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहिती नक्कीच शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेली आहे. राज्यभरातील विद्यार्थी आणि पालक वर्ग कडून मोठ्या प्रमाणावर बारावीचा निकाल कधी लागणार? अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात येत होता. परंतु काल शिक्षण मंडळाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आणि त्यामध्ये जाहीर केले की बारावीचा निकाल हा आज लावण्यात येत आहे. ( HSC Result Maharashtra 2025 )
राज्यभरातील 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी एकूण राज्यभरातील 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असून ही परीक्षा शिक्षण मंडळाकडून 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेली असून 3373 केंद्रावरती ही परीक्षा पार पडलेली होती.
दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार?
मित्रांनो दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार? अशा प्रकारचा प्रश्न सध्या खूप मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे. कारण निकाल लागल्यानंतर देखील पालकांना तसेच विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर शोधाशोध करावी लागते. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी वर्गाकडून दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत देखील प्रश्नांची विचारणा करण्यात येत आहे. ( HSC Result Maharashtra 2025 )
दहावीचा निकाल देखील पुढील आठवड्यामध्ये लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित करण्यात येऊ शकतो. अशी माहिती देण्यात येत आहे. मार्च महिन्यामध्ये परीक्षा झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाच परीक्षा लागलेली आहे. मात्र शिक्षण मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु दहावीच्या निकालाचे सर्व काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे येथे आठवड्यात लवकरच दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहिती सध्या सर्व प्रसार माध्यमांमध्ये पसरत असल्याचे पाहायला देखील मिळत आहे.
( HSC Result Maharashtra 2025 )