Farmer ID Card 2025: फार्मर आयडी कार्ड असे काढा, शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड संपूर्ण माहिती

Farmer ID Card 2025: फार्मर आयडी कार्ड केंद्र सरकारकडून 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र योजना सुरू करण्यात आलेली असून शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढणे खूप गरजेचे आहे. केंद्र सरकारकडून देशभरातील सर्वच शेतकऱ्यांसाठी फॉर्मल आयडी कार्ड योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे फार्मर आयडी कार्ड काढणे जरुरीचे आहे. केंद्र सरकारकडून 2025 मध्ये सुरुवातीपासूनच फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत आहे. आणि जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढत नसाल तर तुम्हाला 2025 मध्ये पीएम किसान योजनेच्या हप्ते मिळण्यासाठी देखील अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारची माहिती सुद्धा केंद्र शासनाकडून देण्यात आलेली होती. शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळत असतो. तसेच फार्मर आयडी कार्ड हे शेतकऱ्यांना सर्व सरकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढायचे असेल तर त्याविषयी आपण सर्व माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

“फार्मर आयडी” कोणाला मिळणार? Farmer ID Card

  • राज्यभरातील तसेच देशभरातील ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचे शेत जमीन आहे आणि त्यांच्याकडे जमिनीचे मालकी हक्क आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना फॉर्मल आयडी कार्ड मिळणार आहे.
  • फॉर्मल आयडी कार्ड मिळण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • तसेच शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी शेतकऱ्यांचे नाव हे सातबारा उतारा वरती असणे आवश्यक आहे.
  • अशा प्रकारच्या शेतकऱ्यांनाच ॲग्री स्टॉक उपक्रमच्या माध्यमातून फार्मर आयडी कार्ड साठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

फार्मर आयडी कार्ड ( Farmer Id Card ) तुम्ही देखील एक शेतकरी असाल तर तुम्हाला या चालू वर्ष 2025 मध्येच आपले फार्मर आयडी कार्ड बनवणे खूप महत्त्वाचे असणार आहे. कारण की अनेक योजनेचा लाभ हा फार्मर आयडी कार्ड वरूनच दिला जाणारा अशा प्रकारची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण फार्मर आयडी कार्ड कसे काढायचे आणि त्याचे फायदे काय आहेत अशा प्रकारची सर्व माहिती जाणून घेऊयात.

फार्मर आयडी करून नोंदणी अशी करा; Farmer ID Registration

तुम्हाला आपल्या ब्राउझर मध्ये जाऊन https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे. आणि या वेबसाईटला जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.

तुम्ही जर एक शेतकरी असाल तर तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईल वरून देखील फार्मर आयडी साठी स्वतःच नोंदणी करू शकता

किंवा सीएससी सेंटरच्या माध्यमातून देखील फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी करू शकता.

Farmer ID Card फार्मर आयडी कार्ड चे फायदे काय?

जे शेतकरी फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत. अशा शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वात महत्वाकांक्षी योजनेचे म्हणजेच की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळणार नाहीत. असे माहिती देण्यात आलेली आहे तरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( PM kisan Sanman Nidhi Yojana )योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 6,000 हजार रुपये 2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी च्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे. आणि हे पैसे तुम्हाला जर मिळवायचे असेल तर तुम्हाला 2025 मध्ये आपले फार्मर आयडी कार्ड काढणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो तुम्हाला आपली फार्मर आयडी कार्ड बनवणे खूप महत्त्वाचे आहे.

फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात?

फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, जमीनचा सातबारा उतारा, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड ला लिंक असणारा मोबाईल नंबर, प्रकारचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ( Farmer ID Card )

फार्मर आयडी कार्ड Farmer Id Card चे प्रमुख वैशिष्ट्ये

  1. जून 2025 पासून पुढे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे अशाच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपले फार्मर आयडी कार्ड काढणे खूप महत्त्वाचे झाले आहे.
  2. तुम्ही जर आपले फार्मर आयडी कार्ड काढले तर तुम्हाला देशभरात तसेच राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या सर्व सरकारी योजनेचा लाभा एकच ठिकाणी मिळणार आहे.
  3. तुमच्याकडे जर फार्मर आयडी कार्ड काढलेले असेल तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्डचा Kisan Credit Card लाभ घेणे देखील अत्यंत सोपे होऊ शकते. आणि याच्यामुळे तुम्हाला खूपच कमी व्याज दरात कर्जपुरवठा होऊ शकतो. असे सहसा हे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्मल आयडी कार्ड काढावेत.
  4. शेतकऱ्यांना शेती विषयीची सर्व माहिती मिळणार आणि आपल्या समस्या वरती तोडगा काढता येणार.
  5. तसेच आपल्या शेतामधील पिकावरती रोग पडलेला असल्यास त्याविषयी सर्व माहिती आपल्याला मिळणार अशा प्रकारचे सर्व लाभ एकाच ठिकाणी घेता येणार
  6. शेतकऱ्यांना डिजिटल पीक कर्ज पिक विमा हमीभाव अशा प्रकारच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
  7. ज्या शेतकऱ्यांकडे किसान फार्मर आयडी कार्ड असेल अशा सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्यांचा हमीभाव देखील चांगला मिळणार आहे. आणि याचा लाभ घेणे देखील सोपे आहे तसेच हमी भावाच्या दरामध्ये आपल्या मालाची विक्री करणे, तसेच जिल्हा केंद्रावर नोंदणी करणे, अशा प्रकारच्या सर्व योजनांचा लाभ हा तुम्हाला फार्मर आयडी कार्ड च्या माध्यमातून घेता येणार आहे. ( Farmer ID Card )

फार्मर आयडी कार्ड कसे बनवायचे? Farmer ID Card Apply Process 2025

शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड Farmer ID Card ऑनलाइन अर्ज: सर्वप्रथम तुम्हाला शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या फार्मर आयडी कार्डच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. आणि येथे तुम्हाला आपली माहिती भरण्यासाठी पेज ओपन होते.

फार्मर आयडी कार्ड चे अधिकृत लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला “Create New User Account” या पर्यायी वरती क्लिक करायचे आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवण्यात येतो. तो ओटीपी तुम्हाला टाकून हे पेज व्हेरिफाय OTP Varification करून घ्यायचे आहे.

या पेजवर ‘Create My Account’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून देखील अर्ज करू शकतात. आणि नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला परत शेतकरी म्हणून लॉगिन या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आहे.

हे पण वाचा 👉 ‘या लाडक्या बहिणींना’ एप्रिल चा हप्ता मिळणार नाही; लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी

येथे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरच्या ओटीपी ने वेरिफिकेशन पूर्ण करायचे आहे. येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन एज फार्मर registration as farmer या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

अशा पद्धतीने तुम्ही या पेजवरती आपली सर्व वैयक्तिक माहिती भरून ओटीपी पडताळणी या पर्यायावर क्लिक करून सबमिट बटणवरती क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट होईल.

Farmer ID Card FAQ

फार्मर आयडी कार्ड मुळे काय लाभ मिळतो?

फार्मर आयडी मुळे देशभरात लाभविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवता येतो. आणि सध्या तुम्ही जर फार्मर आयडी कार्ड काढत नसाल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता देखील मिळणार नाही.

फार्मर आयडी कार्ड कसे काढायचे?

फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी “farmer registry” या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही आपले फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करू शकता.

फार्मर आयडी म्हणजे काय?

फार्मर आयडी कार्ड सोबत आपली शेतजमीन जोडण्यात येऊन आयडी कार्ड बनवण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्याचे नाव असलेली सर्व जमीन यामुळे नोंदणी होणार आहे.

Leave a Comment