PM Kisan Yojana 20 th Installment: केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना ( PM Kisan Yojana 20 th Installment ) ही देशभरातील लहान आणि सिमांत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी योजना होय या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देऊन उत्पादन क्षमतेत वाढ करण्यास आहे. पीएम किसन योजनेच्या आतापर्यंत एकूण 19 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेच्या 19 व्या वितरण बिहार मधील भागलपुर जिल्ह्यामधून करण्यात आलेले होते.
PM Kisan Yojana 20 th Installment
परंतु आता पी एम किसान योजनेचा 20 हप्ता कधी जमा होणार आहे? अशा प्रकारचा प्रश्न सध्या राज्यभरातील शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. आणि शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी अगोदर आपली ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आणि जर शेतकऱ्यांनी आपली इकेवायसी पूर्ण केली नाही. तर शेतकऱ्यांना नमूद करण्यात आलेल्या तारखेला हप्ता मिळणार नाही याची नोंद घेणे गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार 40 हजार, अर्ज करा PCMC Bharti Apply 2025
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana Installment List
पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दर 4 महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे पैसे बियाणे, खत खरेदी करणे, तसेच शेतीशी संबंधित गरजा भागवण्यासाठी देण्यात येतात. 2025 मध्ये पीएम किसान योजनेच्या निधी मध्ये वाढ करण्यात येईल. अशा प्रकारचे चर्चेने मोठ्या प्रमाणात आलेले होते. परंतु याबाबत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे पुढील अर्थसंकल्प 2026- 27 मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेसाठी कोणते निर्णय घेतले जातात. हे देखील पाहणी महत्वाचे ठरणार आहे.
पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता जून 2025 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती सध्या वृत्तवाहिन्यांनी दिलेली आहे.
ई केवायसी करणे बंधनकारक अन्यथा हप्ता मिळणार नाही PM Kisan Yojana KYC
पी एम किसान योजनेचा हप्ता (PM Kisan Yojana 20 th Installment ) जुन 2025 मध्ये जमा करण्यात येणार असला तरीही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अगोदर आपली इ केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. तर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या पुढील हप्ता पासून वंचित रहावे लागू शकते.
- पी एम किसान योजनेची ई केवायसी करण्यासाठी सर्वात प्रथम https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- किंवा तुम्ही पीएम किसान मोबाईल ॲप चा वापर करून आपली ही केवायसी पूर्ण करू शकता.
- तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही सीएससी सेंटर किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र भेट देऊन देखील केवायसी पूर्ण करू शकता.
या जिल्ह्यांचा पिक विमा मंजूर; पिक विमा कधी मिळणार ? पहा Crop Insurance List
