Ladki Bahin Yojana April Installment: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारकडून 55 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेली आहेत. या महिलांमध्ये ज्या महिला या योजनेच्या पात्रता पूर्ण करत नाहीत. किंवा निकषांमध्ये बसत नाहीत. अशा महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्येच अजून कोणत्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. याविषयी सर्व स्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Ladki Bahin Yojana April Installment
महाराष्ट्र सरकारची “मुख्यमंत्री लडकी बहीण योजना” हे राज्य मध्ये कायम चर्चेस राहिलेली योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यभर राहतील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतात अशा मध्येच लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? याची वाट पाहत असतानाच लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण 9 हप्ते बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत दरम्यान आता कोणत्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही. अशी सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहेत. ( Ladki Bahin Yojana April Installment )
या महिलांना एप्रिल च हप्ता मिळणार नाही
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील लाभार्थी महिलांसाठी सरकारकडून काही निकष ठरविण्यात आलेले आहेत. या निकषांमध्ये ज्या महिला पात्र आहेत. त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे देखील निश्चित करण्यात आलेले आहे 2.5 लाख रुपयांपेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त नसावेत.
- लाभ घेणारा लाभार्थी महिलेच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नसावेत.
- महिला सरकारी नोकरी करत असल्यास या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरत नाहीत.
- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. ( इतर राज्याच्या रहिवाश महिला महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेण्यास पात्र नाही)
लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून राबविले जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये ज्या महिला पात्र ठरत आहेत. अशाच महिलांना ( एप्रिल 2025 ) चा हप्ता जमा होणार आहे. आणि ज्या महिला या निकषांमध्ये बसत नाहीत तरीही त्या महिलांनी अर्ज केलेला असेल, आणि या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून नऊ लाख महिलांची अर्ज बाद ठरवण्यात आलेले आहेत. मार्च महिन्यात ज्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेली आहे. त्याविषयी अजून आकडेवारी पुढे आलेली नाही आणि ज्या महिलांच्या अर्ज बात करण्यात आलेले अशा महिलांनी यापुढे पैसे मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी.
एप्रिल चा हप्ता कधी मिळणार? Ladki Bahin Yojana April Installment
राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून एप्रिल चा हप्ता कधी जमा होणार आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात येत होता. परंतु एप्रिलचा हप्ताबाबत अजून पर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु एप्रिलचा हप्ता हा शेवटच्या दोन आठवड्यामध्ये लाडकी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने चा एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता देखील वर वर्तवली जात आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीच्या उत्पन्नाबाबत अजून पर्यंत कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे कदाचित महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी विलंब होऊ शकतो.
गेल्या काही दिवसांमध्ये सरकारकडून लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या खूप मोठ्या प्रमाणावर महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेली असून महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे. अशा मध्येच अजून देखील काही महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार नाही. यामध्ये ज्या महिला या निकषांमध्ये बसत नाहीत. अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच लाभ घेण्यासाठी सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या पात्रता आणि निकषांचे पालन करणे गरजेचे आहे. ( Ladki Bahin Yojana April Installment )
लाडकी बहीण योजना पात्रता काय? Ladki Bahin Yojana
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- राज्यामधील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला तसेच कुटुंबामधील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- लाडकी बहीण योजनेचा लाभ कमीत कमी 21 वर्षे व जास्तीत जास्त 65 वर्ष होईपर्यंत लाभ घेता येईल.
- लाभार्थी महिलांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत असावे.
2 कोटी 63 लाख अर्जांची पडताळणी करणार Ladki Bahin Yojana Verification Status
राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी आयकर विभागाकडून असहकार दर्शवण्यात आलेला आहे. अजून अजून आयकर विभागाने सहकार्य न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी ही आता थांबविण्यात आलेली आहे. परंतु सरकारकडून लवकरच अरची पडताळणी करण्यात येणार असून या योजनेमध्ये नियमन बाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरविण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजने संदर्भात ‘अजित पवार’ यांचे मोठे विधान
अजित पवार म्हणाले की, आमच्या सरकारकडे अजून पाच वर्षे आहेत त्यामुळे आम्ही लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करणार नाहीत. जरा सरकारकडून थोडीशी ओढतान होत आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणीने 2100 रुपये देऊ असे मी केव्हाही सांगितले नाहीत. आणि जर सांगितले असेल तर माझा एकही पुरावा दाखवा असे भाष्य अजित पवार यांनी केलेले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी होणार? अशी विचारणा देखील राज्यातील महिलांकडून करण्यात येत आहे. ( Ladki Bahin Yojana April Installment )
लाडक्या बहिणींना सध्या पंधराशे रुपये देत आहोत. सरकारची परिस्थिती सुधारल्यानंतर आपण त्यात वाढ करण्यासाठी पुढील विचार करूया. असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी? असा प्रश्न विचारल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपयांबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाहीत. आणि जाहीरनामा हा 5 वर्षांसाठी असतो. त्यामुळे महिलांना 5 वर्षांमध्ये केव्हाही एक विषय रुपये देण्यात येऊ शकतात.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
महायुती सरकारने निवडणुकांना अगोदर आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट नमूद केलेले होते. की नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही 2100 रुपये देणार आहोत. परंतु या विधानावरती राज्यभरात कोणीही बोलताना दिसत नाही. आणि 2100 रुपये कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर यावर उत्तर देताना देखील कोण दिसत नाहीत. आदिती तटकरे यांनी सांगितलेल आहे की, सध्या सरकारची परिस्थिती नाही. परंतु येत्या काही कालावधीमध्ये लाडक्या बहिणीने 2100 रुपये निश्चित देण्यात येणार आहेत. Ladki Bahin Yojana
लडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट:
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहे?
वयोगट 21 ते 65 मधील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.
लाडकी बहीण योजना 2024 ची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली आहे?
महाराष्ट्र राज्यात कायम चर्चेत असलेली लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून सुरू झालेली आहे
लाडकी बहीण योजना यादी?
लाडकी बहीण योजनेची यादी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ महाराष्ट्र सरकारच्या या अधिकृत वेबसाईटवर चेक करू शकता.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करावा?
लाडकी बहीण योजनेसाठी दोन प्रकारे अर्ज करता येत आहे.१) https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही लाडके बहीण योजनेसाठी सहजरित्या अर्ज करू शकतात.
२) आणि जर तुम्हाला घरबसल्या मोबाईल वरूनच करत असेल तर ‘नारी शक्ती दूत’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता.
लाडकी बहीण योजना अर्ज कुठे करायचा?
लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात. परंतु लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया सध्या बंद करण्यात आलेली आहे.
