Maharashtra Department of Registration And Stamp Bharti 2025: नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या अंतर्गत पुणे येथील कार्यालय मध्ये शिपाई (वर्ग ड) पदांच्या एकूण 0284 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि या अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात सुरुवात झालेली आहे. ही भरती प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीच्या माध्यमातून होणार असल्याने हे संपूर्ण भरती प्रक्रिया ही ऑनलाइन प्रणाली द्वारे पार पडणार आहेत. या भारती साठी अर्ज करण्यासाठी अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ही या पोस्टमध्ये खाली दिलेली आहे.
Maharashtra Department of Registration And Stamp Bharti 2025
महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागांमध्ये शिपाई नवीन पदांच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 मे 2025 आहे. इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार हे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन जाहिरात होऊ शकतात. किंवा आपण या पोस्टमध्ये खाली नमूद केलेली जाहिरात तसेच अर्ज करण्याची लिंक देखील पाहू शकता. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ही आयबीपीएस कंपनी मार्फत राबविण्यात येत असल्याने ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही 22 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली आहे. आणि या भरती प्रक्रिया मध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ( शालांत परीक्षा ) दहावी पास असणे आवश्यक आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागात 284 पदांसाठी भरती सुरू
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत नोकरी.
- एकूण 284 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- शिपाई वर्ग ड चे हे पद आहे.
- यासाठी शैक्षणिक अर्हता ही दहावी ( माध्यमिक शालांत परीक्षा ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- या पदासाठी वेतनश्रेणी ही 15000 ते 47 हजार सहाशे रुपयांपर्यंत S 1 नुसार पगार आणि इतर भत्ते मिळत असतात.
अधिकृत जाहिरात – | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक- येथे क्लिक करा | https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/ |
वयोमर्यादा काय आहे?: या भरतीसाठी अर्ज सादर करत असताना किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. इत्यादी वयोमर्यादीमध्ये देखील काही शासन निर्णयानुसार सवलती देण्यात येत असतात त्या देखील गरजेचे आहे.
परीक्षा शुल्क:
खुला प्रवर्ग: 1,000 रुपये आहे.
मागासवर्गीय: 900 रुपये आहेत.
अर्ज करण्याची प्रक्रिया: ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवर ला भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकतात. नोंदणी व मुद्रांक विभागाचे ही भरती प्रक्रिया आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून पार पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला आयबीपीएस कोणत्या प्रकारे प्रश्न विचारते हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.
महत्त्वाची सूचना:
नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा अर्ज करत असताना अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे.
अर्जदार उमेदवाराने शैक्षणिक अहर्ता आपली वयोमर्यादा आपली कागदपत्रे तसेच प्रमाणपत्र आरक्षण कागदपत्रे शासन नियमानुसार सर्व माहिती भरणे तसेच सादर करणे आवश्यक आहे.
या परीक्षेमध्ये आयबीपीएस ( IBPS) कंपनीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून या परीक्षेत गुणांची गणना तसेच यामध्ये गुणांचा टप्पे टप्प्याने विचार आणि निवड या संदर्भामध्ये अंतिम निर्णय हा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियामक महाराष्ट्र राज्य पुणे यांचा राहील असे नमूद करण्यात आलेले आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 10 मे 2025