PM Kisan Yojana 2025: तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा ( PM Kisan Sanman Nidhi Yojana 2025 ) लाभ 2025 मध्ये घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार आहे. अशा प्रकारचा सवाल उपस्थित होत असतानाच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता ( PM Kisan Yojana 20 th Installment ) लवकरच जमा होणार आहे. परंतु पी एम किसान योजनेच 20 वा हप्ता जमा होण्याअगोदर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे का? तपासणी खूप गरजेचे आहे. तसेच तुमचे ही केवायसी स्टेटस ( E KYC Status )अपडेट केलेली आहे का? हे पाहणे देखील खूप गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला पुढील हप्ता जमा होण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात.
पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? PM Kisan Yojana 20 th Installment
पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 वर्षांमध्ये जमा झालेला पहिलाच हप्ता आहे. त्यामुळे विसावा हप्ता कधी जमा होणार? अशा प्रकारचा सवाल सध्या राज्यभरातील शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत होता. पुढील हप्ता कधी जमा होणार हे सरकारकडून जाहीर करण्यात आलेले नसले तरीदेखील प्रसार माध्यमांवर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर माहिती देण्यात येत आहे. की पी एम किसान योजनेचा 20 हप्ता हा जून 2025 मध्ये जमा करण्यात येईल. अशा प्रकारची माहिती वृत्तवाहिन्यावर देखील देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहेत. PM Kisan Yojana 2025
पी एम किसान योजनेचा लाभ कसा मिळतो?
पी एम किसान योजनेच्या अंतर्गत सरकारकडून प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना 6 हजार वेगवेगळ्या 3 हप्त्यांमध्ये जमा करण्यात येत आहेत. परंतु 2025 या वर्षांमध्ये आतापर्यंत केवळ 1 हप्ता जमा करण्यात आलेला असून 2025 मध्ये जमा होणारा हा 2 हप्ता असणार आहे. आणि त्यानंतर अजून एक हप्ता या वर्षांमध्ये जमा करण्यात येईल.
पी एम किसान योजना यादी कशी पहायची? PM Kisan Yojana List
जर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही पीएम किसन योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला (PM Kisan Official Website) भेट देऊन तेथे लाभार्थी यादी या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक, तसेच गावाची माहिती प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे “गेट रिपोर्ट” Get Report या बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण स्टेटस पाहायला मिळते. म्हणजे तिथं आपले हप्ते जमा झाले आहेत का? आणि जर हफ्ते जमा झाले नसतील तर काय कारण आहे? आतापर्यंत किती हप्ते जमा झाले आहेत? अशा प्रकारचे सर्व माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळते.
पी एम किसान योजनेची E KYC केली नाही तर पैसे येणार नाही
तुम्ही जर पीएम किसान योजनेची आपली केवायसी पूर्ण केली नसेल, तर लवकरात लवकर करून घ्यावी कारण जर तुम्ही आपली केवायसी केल नाही. तर पीएम किसान योजनेचा हप्ता बँक खात्यावर जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपली ही केवायसी करणे बंधनकारक आहे. यासाठी तुम्ही प्रक्रिया ऑनलाईन पार पाडू शकता. यासाठी तुम्हाला ओटीपी OTP (One Time Password ) द्वारे ऑनलाईन प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी तुम्ही आपल्या मोबाईलवर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करू शकतात. किंवा सीएसटी सेंटर (CSC Centre) किंवा आपल्या जवळ आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील आपला आधार नंबर टाकून मोबाईल नंबरचा ओटीपी टाकल्यानंतर केवायसी पूर्ण करता येते.
20 वा हप्ता या कारणामुळे जमा होणार नाही
- शेतकऱ्यांची बँक खात्याची संपूर्ण माहिती दिली नसल्यास पुढील 20 हप्ता जमा होणार नाही.
- शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती असल्यास जमा होण्यास अडचण येऊ शकतात.
- बँक खात्याच्या माहितीमध्ये कोणतीही चूक झाल्यास किंवा आयएफसी कोड (IFSC Bank) बँक खाते बंद करणे, आधार कार्ड बँक सोबत लिंक नसणे,
- पी एम किसान योजनेसाठी एक पेक्षा जास्त वेळी अर्ज केला असल्यास देखील योजनेतून बाद ठरवण्यात येऊ शकते.
- त्याबरोबरच तुम्ही जर आयकर दाते असाल किंवा तुमच्या घरामधून आयकर भरला जात असेल तरी देखील तुम्ही अपात्र ठरू शकता.
- काही परिस्थितीमध्ये फॉर्म मधून महत्त्वाची माहिती गहाळ झाले असल्यास देखील तुम्हाला हप्ता आणि येण्यासाठी अडचणी येऊ शकतात. ( PM Kisan Yojana 2025 )
आधार कार्ड आणि बँक तपशील देणे बंधनकारक
पी एम किसान योजनेचे हप्ते हे सरकारकडून डीबीटी DBT ( Direct Benifits Transfer) च्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकरीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. आणि यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यासोबत आपले आधार कार्ड लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच बँक तपशील योग्यरीत्या भरणे हे देखील महत्त्वाचे आहे. अन्यथा यामध्ये कोणत्याही चुका असल्यास पीएम किसान योजनेचा हप्त्याला मुकावे लागू शकते. ( PM Kisan Yojana 2025)
Farmer ID Card 2025: फार्मर आयडी कार्ड असे काढा, शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड संपूर्ण माहिती