Sukanya Samriddhi Yojana (SSY) : सुकन्या समृद्धी योजना ही 2025 मध्ये केंद्र सरकारकडून राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना मांडली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून मुली च्या भवितव्याचा विचार करण्यात येत आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून मुलीच्या आई-वडिलांना तिच्या शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नासाठी आणि भविष्यासाठी देखील पैसे जमावणे अशा प्रकारचे उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेले आहे. सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून 2 डिसेंबर 2014 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. परंतु 2025 मध्ये यामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आलेली असून देशातल्या कोट्यावधी मुलींचे भविष्य सुधारण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे.
सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून 21 वर्षाची मुलगी झाल्यानंतर किती पैसे मिळतात. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ कसा घ्यायचा? सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात? आणि या योजनेमध्ये सध्या कोणकणते बदल झालेले आहेत. अशा प्रकारची सर्वर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
योजनेचे नाव | सुकन्या समृद्धी योजना |
सुरू कोणी? | केंद्र सरकार द्वारे |
वय मर्यादा किती? | मुलीच्या जन्मापासून 10 वर्षापर्यंत |
आर्थिक लाभ | योजनेमध्ये गुंतवणूक करून व्याजप्राप्ती होते |
पात्रता | लाभार्थी व्यक्ती देशाचा नागरिक असणे आवश्यक |
योजना कधी सुरू | 2 डिसेंबर 2014 |
अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट |
सुकन्या समृद्धी योजना काय आहे? Sukanya Samriddhi Yojana (SSY) 2025
सुकन्या समृद्धी योजना विशेषतः देशभरातील मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी सरकारने राबवलेली योजना आहे. ही योजना “बेटी बचाव बेटी पढाव” या योजनेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. गरीब कुटुंबामधील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजना चा मुलींना देण्यात येत आहे. कोणताही नागरी या योजनेचा लाभ मिळ शकतो. या योजनेसाठी खाते उघडू शकतात. आणि या योजनेचे लाभ मिळू शकता. याच्या माध्यमातून तुम्ही 3 मुलींचे खाते उघडून लाभ मिळवू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना राबवण्यास सुरुवात अगोदर झालेली असली तरी देखील यामध्ये 2025 मध्ये अनेक मोठे बदल करण्यात आलेले असून सध्या या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील महिलांना उज्वल भविष्यासाठी मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात येत आहे.
सुकन्या समृद्धी योजना लाभ कसा मिळेल? Sukanya Samriddhi Yojana (SSY) 2025
सुकन्या समृद्धी योजनेचे लाभ जर तुम्हाला 2025 मध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचे खाते उघडल्यानंतर तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही 250 किंवा त्याहून कमी रक्कम देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. आणि या योजने चा लाभ घेण्यासाठी सुरुवात करू शकता. तुम्ही एका वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला देखील मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ हा तुमचा गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुदतीच्या नंतर रक्कम परत करण्यात येते. ज्या पालकांची मुलीच्या नावाने भविष्य साठी गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. अशा प्रकारे पालक पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडून या योजनेचा लाभ मिळवू शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये परतावा कधी मिळतो?Sukanya Samriddhi Yojana (SSY) 2025
सुकन्या समृद्धी योजनेचा परिपूर्ण कालावधी हा मुलीचे वय 21 वर्षे ठरवण्यात आलेला आहे. मुलीला पूर्ण 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेची रक्कम देण्यात येते. थोडक्यात उदाहरण; तुम्ही जर आता 2025 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेमध्ये बँक खाते उघडले तर तुम्हाला तर तुम्हाला मुलीचे 21 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर 2046 मध्ये तुमची एकूण रक्कम परताव्यासह तुम्हाला मिळू शकते. तुम्ही जर 2025 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सुरुवात केली तर तुम्हाला या योजनेसाठी पुढील 15 वर्षांसाठी नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला पण योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर योजनेचा 6 वर्षांचा कालावधी हा लॉक इन असतो. या सहा वर्षांमध्ये तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेमधील रकमेस कोणतीही व्याज लागते. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना चक्र वाढ व्याजाचा फायदा मिळतो. ज्यामुळे आपल्याला मिळणारे व्याज देखील मोठ्या प्रमाणात वाढते.
सुकन्या समृद्धी योजनेत रिटर्न किती मिळतो?Sukanya Samriddhi Yojana Return (SSY) 2025
तुम्ही जर तुमच्या मुलीच्या नावाने 2025 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते उघडत असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुम्ही जर 2000 ते 2500 रुपये भरले तर तुमचे गुंतवणूक ही 24000 ते 30 हजार रुपयांच्या दरम्यान होईल. अशाप्रकारे तुम्ही जर एकूण पंधरा वर्षे गुंतवणूक केली तर तुम्ही केलेली गुंतवणूक 3 लाख 60 हजार रुपयांपासून ते 4 लाख रुपयांच्या दरम्यान होईल. ही रक्कम गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून सुकन्या समृद्धी योजनेच्या रकमेवरती 8. 2% व्याज देते. आणि या मिळणाऱ्या व्याजदरच्या आधारे 21 व्या वर्षी व्याजाची पूर्णपणे वाढ झाल्यानंतर तुम्हाला 11 लाख 50 हजार रुपये मिळतील. या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या निधीमध्ये 7 लाख 50 हजार रुपये हे तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात मिळत असतात.
सुकन्या समृद्धी योजनेतील पैसे केव्हा आणि कधी काढता येतात?
(Sukanya Samriddhi Yojana Money Withdrawal (SSY) 2025)
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवलेले पैसे मुलीचे अठरा वर्षे वय पूर्ण आणि दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर काढता येतात.
- जेव्हा मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होते तेव्हा 50% रक्कम ही काढता येत असते.
- या योजनेमधील जेव्हा अपघात किंवा पालकांचा मृत्यू किंवा एखादा गंभीर आजार अशा प्रकारच्या अन्य कारणामुळे पैशाची आवश्यकता भासत असल्यास सुकन्या समृद्धी योजनेमधील पूर्ण वाढ होण्याअगोदर तुम्ही पैसे काढून घेऊ शकतात.
- ही रक्कम काढत असताना एक रकमे किंवा हप्त्याने काढून घेऊ शकतात यासाठी वेगवेगळे नियम आणि अटी देखील लागू करण्यात आलेले आहेत हे तुम्हाला खाते उघडताना सांगण्यात येते.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे Sukanya Samriddhi Yojana Money Withdrawal (SSY) Benifits
- सर्वाधिक व्याजदर: सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही 2025 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 8.2% व्याजदर मिळवू शकता.
- निधीची सुरक्षितता: या योजनेचे पैसे सरकारकडे जात असल्यामुळे तुमचे पैसे 100% सुरक्षित राहतात. त्यामुळे आपल्याला या योजनेत पैशाच्या सुरक्षिततेची हवी मिळते.
- शिक्षणासाठी प्रोत्साहन: मुलींचे उच्च शिक्षण घेण्यासाठी या पैशाची मदत होते. तसेच मुलींच्या शिक्षणाला देखील प्रोत्साहन मिळते.
- करमुक्त लाभ मिळतो: या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या संपूर्ण रकमेवर कोणत्याही कर लागत नाही ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असते सुकन्या समृद्धी योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर कर कपात मिळत आहे.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात? Sukanya Samriddhi Yojana Document
- मुलीचा जन्म दाखला
- मुलीचे आधार कार्ड
- आई-वडिलांचे आधार कार्ड
- लाईट बिल झेरॉक्स
- बँक पासबुक आवश्यक
- मुलीचे पॅन कार्ड
- पालकांचा मोबाईल नंबर
सुकन्या समृद्धी योजना अर्ज प्रक्रिया: Sukanya Samriddhi Yojana Apply Process
सुकन्या समृद्धी योजनेसाठी 2025 मध्ये तुम्हाला खाते उघडून गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे वेगवेगळे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
बँक ऑफ इंडिया मध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही सुकन्या समृद्धी योजना साठी अर्ज करू शकतात. देशभरात पोस्ट ऑफिस बँकांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेची सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि 2025 मध्ये या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आलेला असून सध्या तुम्ही या योजनेच्या माध्यमातून अर्ज भरून लाभ मिळू शकतात.
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस भेट द्यावी लागेल.
- पोस्ट ऑफिस च माध्यमातून तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेसाठी सहजते अर्ज करू शकतात.
- तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जात असतानाच केलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते उघडल्यानंतर तुम्ही 250 रुपयांपासून सुरुवात करू शकतात. तसेच त्यापेक्षा जास्त तुम्हाला सुलभ हप्त्याने रक्कम भरता येत आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज भरत असताना काळजीपूर्वक सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. सोबतच तुम्हाला तुमचा चेक घेऊन जाणे देखील आवश्यक आहे.
- अशाप्रकारे सरकारच्या महत्वपूर्ण योजना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ लाभ मिळवू शकता.
सुकन्या समृद्धी योजना अर्ज प्रक्रिया : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा