Vanrakshak Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, नुकत्याच झालेल्या वनविभागाच्या कार्यक्रमांमध्ये वनमंत्री राम नाईक यांनी वनरक्षक भरतीची तयारी करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे. कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सांगितले आहे. की येत्या महिन्यात 12,991 पदांसाठी ‘वनसेवक’ आणि 2000 जागांसाठी वनरक्षक पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासोबतच चालक शिपाई अशा प्रकारची यापेक्षा इतरत्र वेगळी भरती प्रक्रिया देखील राबविण्यात येणार आहे. यामुळे येत्या महिन्यात मित्रांनो वन विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे तयारी करून इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आणि या जागा विभागांनुसार कशाप्रकारे आहेत. याची सर्व माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहुयात त्यासोबत ही परीक्षा कोण घेणार आहे? यासाठी अभ्यासक्रम काय आहे? शैक्षणिक पात्रता काय आहे? वयोमर्यादा किती आहे? कागदपत्रे कोणती लागतात? कोण अर्ज करू शकतो? उंची किती लागते? ग्राउंड कसे असते? अशा सर्व प्रकारची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो आपल्या इतर मित्रांना देखील नक्की शेअर करा.
Vanrakshak Bharti 2025 वनरक्षक भरती
पदाचे नाव:- वनरक्षक आणि वनसेवक ( Forest Guard )
एकूण पण संख्या:- 12991 जागांसाठी वन सेवक आणि 2000 जागा वनरक्षक
शिक्षण पात्रता:- वनरक्षक पदासाठी बारावी पास असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात तसेच अनुसूचित जमाती (ST Category) इयत्ता दहावी पास वरती अर्ज करू शकतात. ( वनविभागांमधील इतरत्र काही पदे उदा. शिपाई, मदतनीस अशा प्रकारची पदांसाठी दहावी पास अशी पात्रता असू शकते)
मासिक वेतन:- 21,700 पासून ते 69100 रुपये पर्यंत
विभागानुसार रिक्त जागा
नागपूर विभाग – 1852
ठाणे विभाग – 1568
छत्रपती संभाजी नगर – 1535
गडचिरोली विभाग – 1423
अमरावती विभाग – 1188
कोल्हापूर – 1286
धुळे – 931
नाशिक विभाग – 888
चंद्रपूर विभाग – 845
पुणे ८११
यवतमाळ विभाग – 665
येत्या महिन्याभरात वनविभागाकडून रिक्त असणारे एकूण शंभर टक्के जागा भरण्यात येणार आहेत. अशा प्रकारची माहिती वनमंत्री राम नाईक यांनी दिलेली आहे.
अर्ज प्रक्रिया: वनविभागाच्या परीक्षा ह्या टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन घेतल्या जातात त्यामुळे संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन होणार आहे.
वनरक्षक सर्वात मोठी भरती
या येणाऱ्या 2025 मधील सर्वात मोठ्या वनरक्षक भरती प्रक्रियेमध्ये वनरक्षक च्या तसेच वनसेवकाच्या जागा सोबतच इतर जागा देखील वनविभागाकडून भरण्यात येणार आहेत. त्यामुळे यामध्ये खालील जागांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, वन रखवालदार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे वनरक्षक भरती सोबतच वनविभागामधील 100% रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे वन विभागाची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.
| अधिकृत वेबसाईट: | https://mahaforest.gov.in/ |
| जाहिरात सविस्तर | क्लिक करा |
वनरक्षक शारीरिक पात्रता
पुरुष उमेदवारांसाठी- 5 किमी धावण्याची चाचणी परीक्षा होते. 17 मिनिटात आऊट ऑफ मार्क
महिला उमेदवारांसाठी- 3 किमी धावण्याची चाचणी परीक्षा होते. 12 मिनिटाला आऊट ऑफ मार्क
वनरक्षक भरतीचे ग्राउंड हे काही एक – दोन महिन्यांमध्ये होत नाही. मित्रांनो त्यासाठी तुम्हाला 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतची प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. कारण कारण मुलांसाठी शारीरिक चाचणी ही 17 मिनिटांमध्ये 5 किमी धावावे लागते. तर यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर सराव असणे आवश्यक आहे. तसेच मुलींसाठी 12 मिनिटात 3 किमी धावावे लागते.
वनरक्षक भरती अपडेट 2025 Vanrakshak Bharti 2025
वन सेवक पदांसाठी प्रथमच 12,991 पदांसाठी सर्वात मोठी भरती राबविण्यात येत आहे त्याबरोबरच वनरक्षक देखील भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यामुळे भरतीची तयारी करून विचारायला सर्व तरुणांनी आतापासूनच अभ्यासाला लागणे तसेच ग्राउंडचा सराव करणे देखील गरजेचे आहे. वनरक्षक भरती जाहिराती चा जीआर हा 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेला असून यासाठी आकृतीबंध जाहीर करण्यात आलेला आहे. या मार्फत पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
